हिस्टरी टॉक अँड हेरिटेज साईट्स उपक्रमात उलगडला पैठणचा वैभवशाली इतिहास
पैठण, (प्रतिनिधी): पैठणच्या वैभवशाली इतिहासाची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी हिस्टरी टॉक अँड हेरिटेज साईट्स या विशेष उपक्रमाचे आयोजन नागघाट मंदिर, पैठण येथे केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व इतिहासप्रेमींना पैठणच्या प्राचीन इतिहासाची रोमांचकारी सफर घडली.
अध्यक्षस्थानी पैठणचे सुपुत्र तथा अधिकारी जयवंत पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून रेखा कुलकर्णी, भाजप प्रदेश उपध्यक्षा या होत्या. पैठणच्या इतिहासाच्या अनुषंगाने पैठणचा समग्र इतिहास या विषयावर जयवंत पाटील यांनी विचार व्यक्त केले.
तर सम्राट सातवाहन वंश आणि पैठण यावर प्रा. संतोष गव्हाणे तर चक्रधर स्वामी यांच्या काळातील पैठण या ऐतिहासिक विषयावर प्रा. हंसराज जाधव यांनी विचार व्यक्त केले. पैठणचे सुपुत्र, अधिकारी, लेखक व इतिहास संशोधक जयवंत पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पैठणच्या इतिहासाचा सविस्तर व अभ्यासपूर्ण आढावा घेतला. पुरातन प्रतिष्ठान, सातवाहन, चक्रधर स्वामी, संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, राजर्षी शाहू महाराज, भोगनारायण मंदिर, हडप्पा मोहेंजोदडो संस्कृतीचे संदर्भ, पालथी नगरी, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, नवनाथ परंपरा, तीर्थखांब, सिद्धेश्वर मंदिर, जालिंदरनाथ मठ व देवनाथ मंदिर आदी विषयांवर त्यांनी माहिती दिली.
वैभवशाली इतिहासाचा वारसा लाभलेली आणि जगातील नामांकित नगरांनाही हेवा वाटावा अशी दिमाखदार नगरी म्हणजे प्राचीन प्रतिष्ठान अर्थात आजचे पैठण, फ असे सांगत जयवंत पाटील यांनी पैठणच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकला.
सुमारे चारशे साठ वर्ष राज्य केलेल्या व सम्राट पदावर पोहचलेला परंतु दुर्लक्षित असलेल्या सातवाहन काळातील तीस राजांची माहिती देत असताना उजियन ते आंध्र प्रदेश या मोठ्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या या राजवटीत असलेला विविध देशांशी असलेला व्यापार नागणिका सातवाहन या राणीच्या काळातील नाणे घाट येथील शिलालेख ते तेर ढोकी, भोगवर्धन आदी संदर्भ देत सातवाहनाचा इतिहास प्रा. संतोष गव्हाणे यांनी उलगडला.
चक्रधर स्वामी यांच्या काळातील पैठण, घाट महानुभाव पंथाची स्थापना, वास्तव्य आदि बाबत प्रा. हंसराज जाधव यांनी माहिती दिली. आजच्या तरुण पिढीला आपल्या शहराचा इतिहास समजावा, ऐतिहासिक स्थळांची माहिती व्हावी आणि वारसा संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन बालगोपाळ गणेश मंडळ, प्रतिष्ठान पुस्तक प्रकाशक समिती, ताराई महाविद्यालय, हायस्कूल, आइकॉन श्री नाथ पैराडाइस स्कूल, आदिशक्ती महिला आदींच्या नागरी पतसंस्था, सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पैठणच्या पालथी नगरी परिसरात परत
इतिहासाबाबत विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांना जयवंत पाटील यांनी सविस्तर उत्तरे देत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेचे समाधान केले. याप्रसंगी होणार रेखा कुलकर्णी, दिनेश पारिख, उपनगराध्यक्ष तुषार पाटील व शिवाजी गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास नगरसेवक गोवर्धन टाक, गणेश वरकड, शिवा पारिख, उदय सुलाखे, प्रा. राजेश करपे, जालिंदर फलके, आतिष गायकवाड, सुनील पायघन, मदन आव्हाड, दादासाहेब घोडके, उमेश तट्टू, सचिन उंडाळे, भूषण रावस, सुनील मडके, सुधीर रावस, बाळू जोमदे, प्राचार्य रामदास रामावत, रामदास तांगडे, जालिंदर येवले, खलिल धांडे, तसेच पैठण दुर्ग प्रतिष्ठान, बालगोपाल गणेश मंडळ, सुतारपार, ताराई महाविद्यालय, आयकॉन पॅराडाईजचे विद्यार्थी नाथ हायस्कूल विद्यार्थी आणि बहुसंख्य इतिहासप्रेमी नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन हर्षवर्धन पाटील यांनी तर आभार प्राचार्य गणेश शिंदे यांनी मानले. ऐतिहासिक वारशाच्या जतनाबरोबरच नव्या पिढीपर्यंत पैठणचा समृद्ध इतिहास पोहोचविणारा हा उपक्रम ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.












